रविवार, ६ डिसेंबर, २००९
भारतरत्ना डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्ना डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे स्फूर्तिस्थान, तथागत गौतम बुद्ध माझे श्रद्धास्थान आणि सम्राट अशोक माझे आदर्श. तुम्ही मला इतिहास प्रेमी म्हनू शकता. Knowledge is the first strength असं मला वाटतं. प्रयत्नवाद, महत्वाकांक्षा अणि राष्ट्रावर निस्सीम भक्ति - हीच माझी ओळख.चांगले सच्चे दोस्त मिळविने हे माझं काम. चला एकत्र येवुया अणि पुन्हा एकदा समृद्ध, स्वावलम्बी, सामर्थ्यवान, सम्पन्न बौद्धमय भारत उभा करुयात.मैत्री साठी माझा हात केव्हाही पुढे आहे....समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरीरणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ध्रु.घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? १ या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,भिमाची पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? २करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ३पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ४भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ५जंगल जाळपरी भीम पर्वतश्रेष्ठा उठला रे,वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,स्वतंत्रतेचे निशान नीले अजिंक्य राखू धरेवरी,रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)