शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०१०

भीम शक्ति

भीम शक्ति

लेखानिचा जोर
समतेची भाषा
जगण्याची आशा
दिली आम्हा ।

बाबा तुझ्यामुले
स्वातंत्र्याचे पंख
आसमंत अख्ख
उडायला ।
दुबल्याना मुक्ति
देई भीमशक्ति
युवास रे युक्ति
तुझ्यामुले

समतेची ढाल
जाली भीमशक्ति
मिलालिया मुक्ति
बहुजना।

भीमराया तुझा
जपला वारसा
दाविला आरसा
रे सत्याचा ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा